अहमदपूरचे नाव पूर्ववत राजूर करावे यासाठी मा. उपजिल्हाधिकारी यांच्याकडे दहा हजार दोनशे निवेदने सादर
अहमदपूर प्रतिनिधी : अहमदपुर चे पूर्ववत राजूर नाव करावे या मागणीसाठी आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी गीतासार सेवाभावी संस्था,अहमदपूर यांच्या वतीने 10200 अर्जांसह मा.उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. या अर्ज सोबत शहरातील व्यापारी, मित्र मंडळ, संघटना, पक्षाचे, प्रतिष्ठित नागरिक संस्था मठ संस्थान यांच्या वतीने लेटर पॅड वर लेखी पाठिंब्याची निवेदने व तसेच 16 ग्रामपंचायतीच्या बिनविरोध पाठिंबाची ठराव पत्रही जोडण्यात आली आहेत.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना अहमदपूरचा मूळ इतिहास हा राजूर पासून कसा बदलण्यात आला याबाबत अनेक ज्येष्ठांनी आपली मते मांडली. मुळात निजाम हा एक अक्रांता होता. त्याला या राजुरहून जात असताना अहमद नावाची पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे राजुर चे नाव बदलून त्याने अहमदपूर असे केले. मुळात राजूर हे नाव राजूर वरवाळ असे होते. मागे अनेक वर्षापासून अहमदपूरचे नाव राजूर करावे अशा अनेक वेळा मागण्या उठत गेल्या. पण आता अनेक शहरांची नावे बदलली चालली आहेत, त्यामुळे आमच्या मागण्या पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत व निजामाची कसल्याही प्रकारची ओळख आम्ही आता या गावात ठेवणार नाही असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले. तसेच मराठा आरक्षणासाठी जे हैदराबाद गॅजेट सादर करण्यात आले आहे, त्या हैदराबाद गॅजेटमध्ये राजुर वरवाळ याचा उल्लेख सतत येतो. त्यामुळे राजुर या नावाचा इतका मोठा कोणताही पुरावा असू शकत नाही. तसेच आजही अहमदपूरच्या गाव नकाशात कसबा राजुर असा उल्लेख सापडतो. असे अनेक पुरावे या निवेदनासोबत जोडण्यात आली आहेत.
हे निवेदन सादर करताना शहरातील ज्येष्ठ नागरिक पांडूरंग पाटील, विश्व हिंदू परिषदे बजरंग दलाचे श्री मधुकर धडे, संघाचे स्वयंसेवक ॲड. स्वप्निल व्हत्ते, त्रिपुंडाचार्य महाराज, विश्वरूप धाराशिवे, खंडेराव टिकोरे, रवि कच्छवे, गजानन चंदेवाड, अमित बिल्लापट्टे, नरेश यादव, संपन्न कुलकर्णी, अंगद सांगोळे, संतोष जाधव,ऍड धनंजय चाटे, बाळासाहेब शेळके, राम रत्नपारखे, शरद बोजेवाड, किरण पळसकर, राहुल सोमवंशी,बालाजी बोरेवार,रोहित बोराळकर, पांडू मोरे,नारायण फुलारी, अभिषेक जोशी, यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक कार्यकर्ते, नागरिक यांनी हे निवेदन व पुरावे माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले. तसेच अजूनही गावागावातून निवेदने जमा होत आहेत, तशी ते आणून माननीय उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केले जातील असे श्री मधुकर धडे यांनी सांगितले.

