राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन
प्रतिनिधी ज्ञानेश्वर शिंदे
लातूर जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली असल्याने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले
•ओला दुष्काळ’ जाहीर करावा तसेच 2024 मधील शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ मिळावा.
* नदी आणि नाल्यांच्या काठावरील शेतातील संपूर्ण माती वाहून गेली असून त्या ठिकाणी फक्त दगड गोटेच शिल्लक आहेत या जमिनी पुर्ववत पुनर्जीवित करून देण्यात याव्यात.
* बागायती आणी फळबागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी.
* पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत. मोटारी, पाईपलाईन, ठिबक सिंचन संच वाहून गेले आहेत. त्यांना तातडीने मदत करावी.
* घरात पाणी घुसल्यामुळे घरे पडलेल्या कुटुंबांना तात्काळ घरकुल मंजूर करावे.
* पाळीव जनावरे गमावलेल्या कुटुंबांना तात्काळ मदत देण्यात यावी.
* ज्यांची जनावरे पुरात वाहून गेली आहेत.त्यांचा शव विच्छेदन प्रमाणपत्राची अट शिथील करून इतर उपलब्ध नोंदीनुसार त्यांना त्यांची जनावरे खरेदी करून द्यावीत अथवा तेवढी रोख रक्कम द्यावी व चारा तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा.
* पडझड झालेल्या घरांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी मंजूर करावा.
* पावसाळ्यात खराब झालेले आणि उखडलेले गावांतर्गत व गावाकडे जाणारे सर्व रस्ते तसेच विज वितरण व्यवस्था तातडीने दुरुस्त करावीत.
* शेतकऱ्यांचे वीज बिल, ट्रॅक्टर, बैलगाडी, शेती अवजारे यासारख्या बाबीवर असलेले कर्ज माफ करावे.
* शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी” करून त्यांचा सातबारा कोरा करावा व तातडीने नवीन कर्जपुरवठा करावा.
या सर्व मागण्या येत्या 12 ऑक्टोबर 2025 पर्यंत राज्य सरकारने मान्य कराव्यात आणि जर सरकारने शेतकऱ्यांच्या या मागण्याकडे दुर्लक्ष केले तर “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार” पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांना सोबत घेऊन लातूर जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभे केले जाईल याची शासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला.यावेळी
जिल्हाध्यक्ष संजय शेटे
माजी मंत्री विनायकराव पाटील
माजी आ.सुधाकर भालेराव ,प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.संभाजीराव पाटील,शहराध्यक्ष राजा मणियार,प्रदेश सरचिटणीस शिवाजी मुळे,प्रदेश सरचिटणीस सोमेश्वर कदम,शहराध्यक्ष राजा मणियार,मल्लिकार्जुन करडखेळकर,संतोष शिंदे,इंजि.विनायक बगदुरे,मदन काळे, रघुनाथ कुचेकर, लातूर तालुकाध्यक्ष बकतावर बागवान,प्रा प्रशांत घार प्रा.माधव गंगापुरे परमेश्वर पवार,यशवंत भोसले,बालाजी कदम,लक्ष्मीकांत तवले,निशांत वाघमारे, रघुवीर पाटील, युवराज वीर,पप्पू कासले,सन्नऊला शेख, राजाभाऊ माने,ॲड.आशिष चव्हाण,चंद्रशेखर कत्ते,कल्पना फरकांडे,सुरेश पाटील,चंद्रकांत पाटील,समाधान गिरी,रामभाऊ बेल्लाळे,अण्णासाहेब पाटील, गजानन साताळकर,शामराव पाटील, अमरनाथ मुर्के, सय्यद सैदोदिन,विजय राजमाने,प्रमोद पाटील, नारायण नागरगोजे, प्रवीण साळुंखे,शादाब शेख, व्यंकट हंद्राळे,पाशा फरीद, प्रेमचंद पवार,मारुती गायकवाड,नेमचंद पाटील, यशवंत पवार,बाळासाहेब धुपे पाटील, हमीद शेख,सतीश बिरादार,सय्यद अली,बापू पवार,धनाजी कोयले,सारंगे संतोष,सूर्यवंशी दिपक,पांडुरंग बेंबडे,सुरेश रोळे,तुकाराम शिवलकर,पुरुषोत्तम पाटील,डी. उमाकांत,सतीश शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

