प्रतिनिधी नागनाथ लांजे :
दि 29/9/25 रोजी शहीद भगतसिंग यांच्या 118 व्या जयंती निमित्त शहीद भगतसिंग सामाजिक प्रतिष्ठान राजूर यांच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मतीमंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांना अल्पोपहार वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अहमदपुर पोलीस स्टेशन चे पोलीस उपअधीक्षक अरविंद रायबोले तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वंभर स्वामी सर अध्यक्ष मराठी पत्रकार संघ, गोपाळ शर्मा,सुधाकर चेवले मामा,मयूर शेटकर,श्रीराम कलमे हे उपस्थित होते याप्रसंगी अरविंद रायबोले सर व स्वामी सर यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवन चरित्र सांगितलं व सध्याचा युवक कशाप्रकारे भटकत चालला आहे यावर प्रकाश टाकला यावेळी विद्यालयाचे विकास तपसाळे सर,सुपे ए. डी, वाडीकर सर आगलावे सर हे उपस्थित होते सदरील कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी प्रतिष्ठान चे अध्यक्ष देवानंद गोरे,वसंत शिंदे, वैजनाथ होनराव,सुधाकर जाधव, संजय दुधाटे, महालिंग पुणे, अनंत पंडगे,संतोष काडवादे,रोहन बिरादार,पंकज पांचाळ, गोविंद गुडे,शिवकुमार बेद्रे, भागवत सूर्यवंशी,भूषण कांबळे, सचिन पाटील व सर्व सदस्यांनी कष्ट घेतले.

