Explore

Search

November 5, 2025 4:49 am

अहमदपूर ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्यावे शिवसेनेची मागणी

प्रतिनिधी : ज्ञानेश्वर शिंदे

अहमदपूर दि. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर यांच्या नेतृत्वाखाली येथील अहमदपुर तहसील कार्यालयात शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/- रुपये अनुदान द्यावे व अहमदपुर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले
तालुक्यातील सर्व भागात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्याच्या शेतीचे, पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. मागील ऑगस्ट महिन्यापासून आजपर्यंत सरासरी पेक्षा अधिकचा पाऊस झाल्यामुळे कापूस, तूर, उडीद, ज्वारी, सोयाबीन या मुख्य पिकासह अन्य पिकाचे रोज पडत असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणे पुसण्यासाठी हेक्टरी ८५००/- रुपये मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टा करण्याचे काम केले आहे.
तरी शेतकऱ्यांना हेक्टरी ५००००/- रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्याच्या बांधावर मोफत खते, बियाणे उपलब्ध करून द्यावे. अहमदपूर तालूका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तहसिल कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, जिल्हा सहसचिव सिद्धेश्वर औरादे, तालुका प्रमुख दत्ता हेंगणे, तालुका संघटक तथा एस टी कामगार सेना प्रमुख मार्गदर्शक अनिकेत फुलारी, नगरसेवक संदीप चौधरी, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले, उपतालुका प्रमुख गणेश माने, पद्माकर पेंढारकर, पवन देऊळकर,संतोष आदटराव, लहू बारवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक माऊली देवकत्ते,शिरुर ताजबंदचे शहर प्रमुख महेश महापुरे, उपशहर प्रमुख शिवा भारती, शिवकुमार बेद्रे, विभाग प्रमुख कालिदास धुळगुंडे, गजानन येन्ने,सोमनाथ आढाव, धनराज घोरपडे, शहर संघटक अमर कोरे, कृष्णा नामवाड या सर्वानी स्वाक्षऱ्या करून ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन देण्यात आले .

Leave a Comment

Youtube
विज्ञापन
लाइव क्रिकेट स्कोर