Explore

Search

September 19, 2025 5:54 pm

अनिकेत फुलारी यांची एस टी महामंडळ तालुका मार्गदर्शक प्रमुखपदी व शिवसेना तालुका संघटकपदी नियुक्ती

अहमदपुर दि. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना नेते तथा खासदार, एस टी कामगार सेना महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद सावंत, शिवसेना नेते सुनिल प्रभु, मराठवाडा समन्वयक विश्वनाथ नेरुरकर, जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण, यांच्या सुचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, उपजिल्हा प्रमुख भारत सांगवीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘शिवनेरी’ शिवसेना कार्यालयात तालुक्यातील पदाधीकाऱ्यांची निवड करण्यात आली.
यावेळी अनिकेत फुलारी यांची शिवसेना तालुका संघटकपदी व महाराष्ट्र एस टी अहमदपूर आगार कामगार सेनेच्या प्रमुख मार्गदर्शकपदी नियुक्ती जाहीर करुन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर, जिल्हा कार्यालय प्रमुख सुभाष गुंडीले,तालुका प्रमुख दत्ता हेंगणे, उपतालुका प्रमुख गणेश माने, संतोष आदटराव, शिवसेना सहसचिव पद्माकर पेंढारकर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माऊली देवकत्ते, उपशहर प्रमुख शिवा भारती,ॲटो सेना तालुका अध्यक्ष तथा उपशहर प्रमुख शिवकुमार बेद्रे, सोमनाथ आढाव, कृष्णा रोकडे, भगवान कदम, व्यंकट सुरकुटे यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

Youtube
विज्ञापन
लाइव क्रिकेट स्कोर