दिनांक 15 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा सन्माननीय नेते माननीय श्री चंद्रशेखरजी शिरुरे सर यांच्या अध्यक्षतेखाली अहमदपूर तालुका शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्यांची बैठक समूह साधन केंद्र अहमदपूर येथे संपन्न झाली या बैठकीस अहमदपूर तालुक्यातील सर्व केंद्रातून शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते सर्वप्रथम जिल्हाध्यक्ष माननीय शिरुरे सरांचे शाल पुष्पहार देऊन केंद्रप्रमुख कोनाले सरांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले सोबत चाकूर तालुका अध्यक्ष पांचाळ सर, चव्हाण सर सचिन जाधव सर उपस्थित होते…. त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने श्री गुरमे सर केंद्रीय मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला,
आढावा बैठकीमध्ये सर्वप्रथम शिरुरे सरांनी तालुक्यातील केंद्रनिहाय शिक्षक बंधू भगिनींच्या अडीअडचणी जाणून घेतल्या तालुकास्तरावरील अडचणी सोडविण्यासाठी तालुका संघटनेने सक्रिय राहण्याचे आवाहन करून उद्बोधन केले जिल्हास्तरावर कोणती अडचण असेल तर संघटना पूर्ण शक्तीनिशी संबंधित विभागाला भेटून अडीअडचणींचा निपटारा केला जाईल याचे त्यांनी आश्वासन दिले, बैठकीत खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते अहमदपूर तालुका अध्यक्ष म्हणून वळसंगी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक माननीय श्री काशिनाथ हावगिआप्पा हिंगणे यांची निवड करण्यात आली, तर श्री रमेश बिराजदार सर सह शिक्षक प्राथमिक शाळा तीर्थ यांची तालुका कार्यवाह म्हणून निवड करण्यात आली,श्री संजयजी परतवाघ सर प्राथमिक शाळा टाकळगाव (शे) यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
प्राथमिक शाळा वरवटी येथील पदवीधर शिक्षक श्री शिवाजीराव मुंडे सर यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली,श्री अण्णाराव गोणे सर प्राथमिक शाळा धसवाडी यांची तालुका संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली… तर खंडाळी प्रशालेचे आमचे मार्गदर्शक शिक्षक नेते श्री विलासराव आगलावे सर यांना तालुका नेता म्हणून नियुक्ती करण्यात आली…. श्री प्रल्हादराव हालसे सर प्राथमिक शाळा देवकरा यांची तालुका सहसचिव श्री बळीराम सूर्यवंशी सर प्राथमिक शाळा शिंदगी खुर्द यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तर श्री प्रशांत पांचाळ सर प्राथमिक शाळा वरवटी यांची तालुका प्रचार प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली तर श्री बालाजी विष्णुदास मुंडे सरांची जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली…. निवड केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माननीय जिल्हाध्यक्षांच्या हस्ते पत्र देऊन शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवाजीराव मुंढे सर यांनी केले… याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शिरुरे सर, तालुका अध्यक्ष काशिनाथराव हिंगणे सर यांनी मनोगत व्यक्त केले … नूतन कार्यकारणीचे शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे कार्यकारी अध्यक्ष बाबुराव गाडेकर मराठवाडा विभागाचे अध्यक्ष भगवानराव जायभाये आहे विभागीय कोषाध्यक्ष गोविंद कोलपुके यांनी अभिनंदन केले आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रल्हाद हालसे यांनी केले तर आभार बालाजी विष्णूदास मुंडे सर यांनी केले…. चहापानानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
